Threat Call : मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवू; मध्यरात्री मुंबईच्या सहआयुक्तांना फोन

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोट घडवून देण्याच्या धमक्या सातत्याने दिल्या जात आहे.
 mumbai police
mumbai policeesakal

Threat Call To Joint Commissioner Of Mumbai Police : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोट घडवून देण्याच्या धमक्या सातत्याने दिल्या जात आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सततच्या धमक्यांमुळे मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. त्यात आता मुंबईच्या सहआयुक्तांना मध्यरात्री एका व्यक्तीने मीरा भाईंदरमध्ये स्फोट घडवून आणू अशी धमकी दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 mumbai police
Eknath Shinde : भाजप CM शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत? शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या हालचाली वाढल्या

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्तांना मध्यरात्री दोन वाजता यशवंत माने नावाच्या व्यक्तीने फोन केला. यावेळी मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणू असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीने हा स्फोट मीरा भाईंदर परीसरात नेमक्या कोणत्या परिसरात आणि कधी केला जाईल याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

 mumbai police
Sushma Andhare : "मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा"

त्यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचाना देण्यात आल्या असून, फोन करणाऱ्या व्यक्तीने नेमकं कुणाच्या सांगण्यावरून हा फोन केला आहे. तसेच ही व्यक्ती एखाद्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे का याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com