चौकमध्ये गोदामातून साडेतीन लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

खालापूर : खालापूर हद्दीत चौक गावाच्या हद्दीत कुरिअर गोदामाच्या शटरचा लॉक तोडून चोरट्याने साडेतीन लाखाची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. 

खालापूर : खालापूर हद्दीत चौक गावाच्या हद्दीत कुरिअर गोदामाच्या शटरचा लॉक तोडून चोरट्याने साडेतीन लाखाची रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. 

चौक येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड नावाचे गोदाम आहे. रविवारी सकाळी गोदामाच्या शटरचे लॉक तुटलेले तसेच शटर अर्धवट उघडे असल्याचे गोदामाचे व्यवस्थापक सतीश नामदेव पाताडे यांना कुरिअर बॉयकडून समजले. सतीश यानी गोदामात येऊन तपासणी केली असता कपाटाच्या तिजोरीत असलेली तीन लाख ४७ हजार  ८९० रुपये रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.

गोदामाचे व्यवस्थापक सतीश यांनी चौक पोलिस चौकीत चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या सूचनेनंतर महिला पोलिस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलिस नाईक प्रसाद पाटील, अजय मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या वेळेस चोरट्याने सुरक्षारक्षक तसेच सीसी टीव्ही नसल्याचा फायदा घेत गोदामाच्या शटरचे लॉक तोडले असून गोदामातील इतर वस्तूंना हात न लावता रोख रक्कम लंपास केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three and a half million lamps from the godown in the square