
Mumbai Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार, चार जखमी
मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघाता एक वर्षाच्या चिमुकल्यासह तीन प्रवासी ठार तर चार प्रवासी जखमी झाले आहेत.हा अपघात खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झाल्याची माहिती पुढे आली आहे. (Mumbai-Ahmedabad highway Accident)
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कासाजवळ रविवारी दुपारी हा अपघात झाला. तर त्याच कारमध्ये प्रवास करणारे चार जण गंभीर जखमी झाले.
कारने नालासोपारा येथील कुटुंबिय भिलाड (गुजरात) येथे जात असताना दुपारी सव्वा वाजल्याच्या सुमारास हा अपघात घडला. राष्ट्रीय महामार्गाच्या गुजरातकडे जाणाऱ्या मार्गीकेवर श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुमारे एक किलोमीटर पुढे ही भीषण घटना घडली.
या घटनेला दुजोरा देताना पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे की, हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून नालासोपारा येथील रहिवासी आहेत. ते वॅगनआर कारमधून गुजरातमधील भिलाडला जात होते . जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिड-डेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.