
Jal Jeevan Mission
ESakal
ठाणे : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. मात्र या योजनेत कार्यरत जिल्हा तज्ज्ञ, बीआरसी कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून मानधन थकले असून, आर्थिक गणिते कोलमडली आहेत. परिणामी दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात हे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.