दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांचा लिलाव, तब्बल 1.10 कोटींना विकली गेली मालमत्ता

अनिश पाटील
Tuesday, 1 December 2020

इक्बाल मिरची याच्या मालमत्तांची पुन्हा विक्री झाली नाही 

मुंबई, ता.1 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या यांच्या रत्नागिरीच्या दोन वडीलोपार्जीत मालमत्तांचा लिलाव मंगळवारी झाला. या मालमत्तांसाठी 1.10 कोटी बोली लागली आहे. दाऊदचा विश्वासू इक्बाल मिरची यांचा मालमत्तांसाठी सलग सलग तिसऱ्यांदा कोणीही उत्सुकता दाखवली नाही. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट (सफेमा) अंतर्गत हा लिलाव पार पडला.

रत्नागिरीतील खेड येथील तीन  मालमत्ता असून त्यात एका पेट्रोल पंपचा समावेश आहे. हा पेट्रोल पंप दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नावावर आहे. या तीनही मालमत्ता रत्नागिरीतील व्यावसायिक रवी काटे यांनी एक कोटी 10 लाखाला खरेदी केल्या. या लिलावात काटेंसह दोघे सहभागी झाले होते. पण दुसऱ्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी तांत्रिक कारणामुळे माघार घेतली.

महत्त्वाची बातमी चक्क लाच म्हणून अधिकाऱ्याने मागितल्या दोन साड्या, ACB कडून गुन्हा दाखल

दरम्यान दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलाव झाला नाही. तीनवेळा सफेमा मार्फत या मालमत्तेचा लीलाव करण्यात आला. पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी 45 लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 501 व 502 हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ 1200 चौ. फुट आहे.

नोव्हेंबर महिन्यात सहा मालमत्तांचा लिलाव झाला. पण तांत्रिक कारणामुळे एका मालमत्तेचा लीलाव होऊ शकला नाही. दाऊदच्या कुटुंबियांशी संबंधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे या मालमत्ता आहेत. त्याती सहा मालमत्ता मुम्बाके या गावात आहेत. त्यात 27 गुंठे जमीन, 29.30 गुंठे जमीन, 24.90 गुंठे जमीन, 20 गुंठे जमीन, 18 गुठे जमीन तसेच 27 गुठे जमिनीसह एक घर अशा सहा मालमत्ता होत्या. त्यांचा लिलाव करण्यात आला होता. पण खेड परिरातच लोटे येथेही 30 गुंठ्यांची एक जागा आहे. तिचा लिलाव तांत्रिक कारणामुळे होऊ शकला नव्हता.

three properties of dawood ibrahim auctioned and sold for one crore ten thousand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three properties of dawood ibrahim auctioned and sold for one crore ten thousand