esakal | ...अन्यथा 50 काेटींचा मानहानीचा दावा दाखल करु, भाजपचे महापौरांना थेट आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor kishori pednekar

...अन्यथा 50 काेटींचा मानहानीचा दावा दाखल करु, भाजपचा इशारा

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : उद्यानाचे टिपू सुलतान नामकरण करण्यास विरोध करणाऱ्या भाजपने (BJP) 2013 मध्ये रस्त्याचे नाव टिपू सुलताना करताना विरोध केला नव्हता, असा दावा करत संबंधीत प्रस्तावाची कागदपत्रं महापौरांनी (Mayor) प्रसिध्द केली होती. या कागदपत्रांमध्ये भाजपचे तत्कालीन नगरसेवक,आमदार अमित साटम (Amit Satam) अनुमोदक असल्याचा दावा केला होता. मात्र,ही कागदपत्र बनावट (Fake Documents) असून स्थापत्य समितीत रस्त्याच्या नामकरणाला अनुमोदक असल्याचे सिध्द करावे अन्यथा 50 काेटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करु असा इशारा दिला आहे. ( Tipu Sultan Name issue BJP Critisices Mayor kishori pednekar of BMC - nss91)

गोवंडी येथील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या बाजार व उद्यान समितीत सादर करण्यात आला होता.हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी केली.तर,अध्यक्षांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.त्यावर भाजपच्या सदस्यांनी महापौर पेडणेकर यांची भेट घेऊन प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. शुक्रवारी महापौरांनी पत्रकार परीषदेत भाजप या मुद्दयावरुन राजकरण करत असून डिसेंबर 2013 मध्ये स्थापत्य समिती उपनगरेत या रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता.

हेही वाचा: आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्धरीत्या चित्रीकरण करावे- मुख्यमंत्री  

त्यावेळी भाजपचे सदस्य उपस्थीत होते.असा दावा महापौरांनी केला होता.त्यानंतर काही कागदपत्रही सादर केली होती.त्यात,अनुमोदक म्हणून अ.भा.साटम यांचे नाव नमुद आहे. यावरुन आज आमदार अमित साटम यांनी महापौरांवर तोफ डागली आहे.‘आपण कधीही स्थापत्य समितीचे सदस्य नव्हतो. ही खोटी कागदपत्र महापौर सादर करत आहे. महापौरांनी केलेले आरोप सिध्द करावेत अथवा त्यांच्यावर 50 काेटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करुन असा इशाराच साटम यांनी दिला आहे.

loading image