
मुंबईः शहरातील खड्डे बुजविण्यात येत नसल्यानं ठाणे महापालिकेवर सगळीकडून टीका करण्यात येत होती. त्यानंतर बुधवारी दुपारनंतर खड्डे बुजवण्याची मोहिम पालिका प्रशासनानं हाती घेतली. त्यानंतर आतापर्यंत २४ तासात ११२२ पैकी ८५६ खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला आहे. त्यामुळे उर्वरित ३२० खड्डे बुजवण्याच काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा खड्डयांची पाहणी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह त्यांनी एमएसआरडीएच्या अधिकाऱयांनाही रस्त्यावर उतरण्यास भाग पाडल्यानं खड्डे बुजविण्याचा कामाला वेग आल्याचं दिसतंय.
खड्डय़ांच्या त्रासामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर टीकाही सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढून तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. तर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनीही शहरात दौरा करून तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. तर विरोधक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता.
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी दुपारपासून शहरात खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने तीन हात नाका, नितीन कंपनी ते लुईसवाडी सेवा रस्ता, दालमिल नाका, एम्को कंपनी, माजिवाडा नाका, तीन हात नाका उड्डाणपूल आणि कशीश पार्क याठिकाणी खड्डे बुजविले आहेत. खड्डे बुजविण्याची ही मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान खड्डे बुजविण्याची ही मोहिम सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले असून त्यामध्ये हयगय झाल्यास कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्ग तसेच उड्डाणपुलावर पडलेल्या खड्डभरणी कामाच्या पाहणीसाठी आयुक्त डॉ. शर्मा गेले असता त्या ठिकाणी काम सुरू झालं नसल्याचं त्यांना दिसलं. याबाबत त्यांनी तात्काळ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली. त्यानंतर दोन्ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करुन जोपर्यंत काम सुरु होत नाही. तोपर्यंत मी येथून जाणार नसल्याचा पवित्रा आयुक्तांनी घेतला. संबंधित विभागात अधिकाऱ्यांची पालकमंत्री शिंदे यांनीही चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर काम सुरु झाले.
TMC Repairing Thane City Potholes Work begins on the battlefield
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.