
भिवंडी : शेलार ग्रामपंचायतीने घरागणिक दरमहा २०० रुपये अतिरिक्त पाणीबिल आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मंजूर नळजोडणीनुसार नव्हे, तर प्रत्यक्ष घरांच्या संख्येनुसार हे शुल्क लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक रहिवासी अन्यायकारक शुल्क आकारणीमुळे संतप्त झाले आहेत. ग्रामपंचायतीची थकबाकी वाढल्याने ते भरण्यासाठी आणि पाणीकपात टाळण्यासाठी, हा नवीन नियम लागू केल्याचे ग्रामपंचायतीकडून रहिवाशांना सांगितले जात आहे.