बेस्ट ॲपचे आज उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

बेस्टचे नवीन ट्रॅकिंग ॲप आणि बेस्टच्या ताफ्यातील इलेक्‍ट्रिक बस यांचा उद्‌घाटन सोहळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ९) दुपारी १ वाजता होणार आहे.

मुंबई - बेस्टचे नवीन ट्रॅकिंग ॲप आणि बेस्टच्या ताफ्यातील इलेक्‍ट्रिक बस यांचा उद्‌घाटन सोहळा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ९) दुपारी १ वाजता होणार आहे. बेस्टच्या या नव्या ॲपमुळे आता प्रवाशांना बसच्या अचूक वेळा  कळणार आहेत. 

अनेकदा बस वाहतूक कोंडीमध्ये अडकतात. त्यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर ताटकळावे लागते. प्रवाशांची ही रखडपट्टी टाळण्यासाठी हे नवे ॲप तयार करण्यात आले आहे. या नव्या ॲपमुळे आता प्रवाशांना थांब्यावर बस येण्याची अचूक वेळ कळणार आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईकरासांठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या सोमवारी या ॲपसह नव्या इलेक्‍ट्रिक बसचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. या समारंभास केंद्रीय उद्योग व अवजडमंत्री अरविंद सावंत, तसेच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today the inauguration of the Best App