esakal | दिलासादायक! मुंबईत आज नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त

बोलून बातमी शोधा

mumbai-covid.jpg

अशी आहे आजची आकडेवारी

दिलासादायक! मुंबईत आज नवीन कोरोनाबाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मागच्या २४ तासात मुंबईत ६,९०५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ५ लाख २७ हजार ११९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार २६७ आहे. 

मागच्या २४ तासात मुंबईत कोरोनामुळे ४३ नागरिकांनी प्राण गमावले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ४३ रुग्णांपैकी ३६ रुग्णांना सहव्याधी होत्या. 

गोरेगावच्या नेस्को जंबो कोविड सेंटरला मिळणार 1500 बेड्स

एक चांगली दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आज कोरोनाबाधितांपैकी कोरोनामधुन बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत आज ९ हजार ३७ रुग्ण कोरोनामधुन बरे झाले, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मुंबईत कोरोनामधुन आतापर्यंत ४ लाख २३ हजार ६७८ रुग्ण बरे झाले आहेत. 

"मोदींनी लॉकडाउन करताना कुणाच्या खात्यात पैसे जमा केले होते का?"

सोमवारी मुंबईत एकूण ३९ हजार ३९८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत ४६ लाख ५० हजार १८७ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ८० टक्के झाला असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३६ दिवस झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत ९१९ इमारती सील केल्या आहेत. महापालिकेने ८५ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत.