esakal | काय सांगता! आज मुंबईत फक्त 587 कोरोनाबाधितांची भर; पण जरा थांबा, पुर्ण सत्य जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! आज मुंबईत फक्त 587 कोरोनाबाधितांची भर; पण जरा थांबा, पुर्ण सत्य जाणून घ्या

आयसीएमएरच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे आज मुंबईतील बाधित रूग्णांची संपूर्ण माहीती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबईतील केवळ 587 बाधित रूग्णांची नोंद झाली,त्यामुळे तिन महिन्यानंतर मुंबईतील नविन रूग्णांचा आकडा खाली आला.

काय सांगता! आज मुंबईत फक्त 587 कोरोनाबाधितांची भर; पण जरा थांबा, पुर्ण सत्य जाणून घ्या

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : आयसीएमएरच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे आज मुंबईतील बाधित रूग्णांची संपूर्ण माहीती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबईतील केवळ 587 बाधित रूग्णांची नोंद झाली,त्यामुळे तिन महिन्यानंतर मुंबईतील नविन रूग्णांचा आकडा खाली आला. मुंबईतील  एकूण रुग्णसंख्या 1,37,678 झाली आहे.मुंबईत आज 35 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,474 वर पोचला आहे. मुंबईत आज 883 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.                                                
मुंबईत आज नोंद झालेल्या 35 मृत्यूंपैकी 27 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 22 पुरुष तर 13 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 35 रुग्णांपैकी 28 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                   
कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 883 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,11967 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 88 दिवसांवर गेला आहे. तर 24 ऑगस्ट पर्यंत एकूण 7,15,543  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  18 ऑगस्ट  ते 24 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.79 इतका आहे. 
---------------------------------   
चौकट 
मुंबईत 599 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,936 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 3,359 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,015 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

loading image
go to top