मुंबईत आजपासून लसीकरण, पालिकेला मिळाले १ लाखापेक्षा जास्त डोस

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासकीय आणि महानगरपालिका मिळून एकूण 314 लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत.
 corona vaccination
corona vaccinationEsakal

मुंबई: मुंबई महानगरपालिकेला (bmc) काल एकूण 1 लाख 5 हजार कोविड प्रतिबंधक लसींचा (vaccine) साठा प्राप्त झाला आहे. यामुळे आज गुरूवार 5 ऑगस्ट 2021 पासून कोविड लसीकरण मोहीम पुन्हा सुरु होणार आहे. महानगरपालिकेला प्राप्त लस साठ्यामध्ये कोविशिल्डचे (covieshield) 57 हजार तर कोव्हॅक्सिनचे (covaxin) 48 हजार डोस समाविष्ट आहेत. असे एकूण 1 लाख 5 हजार डोस प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शासकीय आणि महानगरपालिका मिळून एकूण 314 लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी मुंबईतील 227 निर्वाचन प्रभागांमध्ये मिळून असलेल्या एकूण 270 लसीकरण केंद्रावर आता 18 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना थेट जाऊन (वॉक इन) लस घेता येईल.

 corona vaccination
परमबीर सिंहांच्या अडचणी वाढल्या; लुकआउट नोटीस होणार जाहीर

असे असले तरी गर्भवती महिला, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विदेशात नोकरी / व्यवसायासाठी जाणारे नागरिक यांना त्यांच्यासाठी निर्देशित केलेल्या लसीकरण केंद्रावरच लस देण्यात येईल. 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र वगळता इतर सर्व म्हणजे शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर प्रचलित पद्धतीप्रमाणेच म्हणजे 50 टक्के नोंदणी आणि 50 टक्के थेट येणाऱ्यांना (वॉक इन) लसीकरण याप्रमाणे कार्यवाही सुरू राहणार आहे.

 corona vaccination
कुमार मंगलम बिर्ला यांचा 'व्होडाफोन-आयडिया'च्या चेअरमनपदाचा राजीनामा

तसेच, सर्व लसीकरण केंद्रांवर, प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या डोस साठी 30 टक्के तर दुसऱ्या डोस साठी  70 टक्के लस साठा उपयोगात आणला जाणार आहे. वॉक इन आणि नोंदणी ह्या दोन्ही पद्धतीमध्ये हेच सूत्र पाळले जाणार आहे. उदाहरणार्थ, एका केंद्रांवर जर दिवसभराच्या सत्रात 100 डोस दिले जाणार असतील तर त्यात 30 लस ह्या पहिला डोस घेणाऱ्यांसाठी आणि 70 लस ह्या दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांना देण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com