मुरुड तालुक्यात वीज चोरां विरुद्ध कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरुड तालुक्यात वीज चोरां विरुद्ध कारवाई
मुरुड तालुक्यात वीज चोरां विरुद्ध कारवाई

मुरुड तालुक्यात वीज चोरां विरुद्ध कारवाई

sakal_logo
By
मुरूड तालुक्यात वीजचोरी १३ लाखांचा दंड वसूल मुरूड, ता. ५ (बातमीदार) : वीज मीटरमध्ये बदल करून वीजचोरी करणाऱ्या मुरूड तालुक्यातील ४५ ग्राहकांविरुद्ध महावितरण कंपनीने कारवाई करून १३ लाख ३४ हजार ५३१ रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांना धक्का दिला आहे. एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुरूड तालुक्यात छापे टाकले. यामध्ये ४५ ग्राहकांना वीजचोरी करताना पकडले. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा महसूल गोळा केला. महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कार्यवाही करण्यात आली.ग्राहकांनी वीज चोरी करू नये, मीटरमध्ये बदलही करू नयेत, असेही आवाहन त्यांनी केले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top