बनावट धनादेशद्वारे १८ लाखांची फसवणूक
sakal media

बनावट धनादेशद्वारे १८ लाखांची फसवणूक

अडीच हजार प्रकल्पग्रस्तांना मिळाला चारपट मोबदला

बनावट धनादेशांद्वारे १८ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. २२ : बनावट धनादेश व बनावट सहीद्वारे धनादेश वटवून एकाची १८ लाखांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार भोसरी येथे घडला.

याप्रकरणी राजेश लालसाहब सिंह (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे अंन्सुल प्रोटेक्शन सर्व्हिसेस कंपनीच्या नावाने युनियन बँक ऑफ इंडिया भोसरी शाखेत खाते आहे. दरम्यान, वीस बनावट धनादेशांद्वारे २१ लाख २० हजार ७२३ रुपये आरोपीने परस्पर खोटे धनादेश व फिर्यादी यांच्या भावाची खोटी सही करून धनादेश वटवले. दरम्यान, ते धनादेश बनावट असल्याचे व त्यामध्ये आठ चुका असल्याचे बँकेच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दोन लाख ४९ हजार रुपये पुन्हा फिर्यादीच्या बँक खात्यात पाठवले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com