एसटी कर्मचारी रूजू होण्याच्या तयारीत?

एसटी कर्मचारी रूजू होण्याच्या तयारीत?

मुंबई, ता. २६ : राज्य शासनाने एसटी विलीनीकरणाच्या समितीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला, त्यानंतरही अद्याप अहवालाची स्पष्टता होत नाही. त्यामुळे संपकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गेले चार महिने सुरू असलेल्या संपामुळे वेतन मिळालेले नाही. त्यात काहींची घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विलीनीकरणाचा अहवाल काहीही असला तरी सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेऊन एक संधी दिल्यास कामावर रुजू होण्यास तयार असल्याचे मत संपकरी खासगीत व्यक्त करीत आहेत.
सरकारने आजवर संपकऱ्यांना चार वेळा कामावर जाण्याची संधी दिली आहे. वेतनवाढ, भत्त्यांमध्ये वाढ दिली आहे. शिवाय वेतनाच्या फरकाच्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. त्यानंतरही संपकरी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. या काळात मोजक्या कर्मचाऱ्यांनी संपातून बाहेर पडत सेवेत रुजू झाले.
...
आत्महत्या थांबत नाहीत
कोरोना काळात एसटीचे उत्पन्न जवळपास बुडाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या निर्माण झाली. परिणामी आर्थिक संकटात सापडलेल्या सुमारे ५० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतरही आता विलीनीकरणाच्या मागणीवर ताणलेल्या संपामुळे एसटी कर्मचारी आयुष्य संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत आहेत. शुक्रवारी उस्मानाबाद येथील हनुमंत आकोसकर यांनी विषप्राषण करून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर काही संपकरी कर्मचाऱ्यांच्या खासगीतील प्रतिक्रिया संपातून बाहेर पडण्याविषयी होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com