Sun, March 26, 2023

''लवासा'' बाबत आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पट करा
'लवासा' बाबत आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी : आशिष शेलार
Published on : 1 March 2022, 12:09 pm
मुंबई : लवासा प्रकरण राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यात पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार ॲड. आशीष शेलार यांनी केली केली. काही दिवसांपूर्वी लावासा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला.
हा निकाल राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचला असेल अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते, की लवासामध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरुपयोग आहे, प्रशासकीय हलगर्जीपणा आहे, पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग आहे तसेच राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे. या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे, व्यक्तिगत स्वारस्य आहे, कर्तव्य निभावताना हलगर्जीपणा आहे, असे न्यायालयाने तोशेरे ओढले आहेत असे शेलार म्हणाले.