
शून्य मृत्यूचा सलग पाचवा दिवस
मुंबई, ता. १ : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली. आता मुंबईत गेले पाच दिवस सतत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे.
फेब्रुवारीत मुंबईत नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली.
आज केवळ ७७ नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १०,५६,५४९ वर पोहोचली आहे. आज १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १०,३६,२२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५,२७९ दिवस झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोनावाढीचा साप्ताहिक दरदेखील ०.०१ पर्यंत खाली आला आहे. आज एकही कोविडबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसून मृतांचा एकूण आकडा १६,६९१ वर स्थिर आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे. आज दिवसभरात १६,२७७ कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत १,६२,००,१८३ एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.
......