
कोरोना केंद्रे हटविण्याबाबत पालिका सावध
मुंबई, ता. ४ : कोरोना संसर्ग पूर्ण नियंत्रणात आहे. सात जम्बो केंद्रांत केवळ ५० रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे कोरोना काळजी केंद्रे हटविण्याचा विचार करत असतानाच आयआयटी कानपूरने जुलैमध्ये चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे पालिकेने आता सावध पवित्रा घेतला आहे.
मुंबईत सध्या ६५० कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यातील १३० रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. तर,२२९ रुग्णांना कृत्रिम प्राणवायू पुरविण्यात येत आहे. गेले काही दिवस दैनंदिन रुग्णांचे प्रमाण घटले आहे. अशात कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण १०२ टक्के आणि दुसरी मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ९८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे मास्क वापरण्याचे बंधन वगळता सर्व बंधने हटविण्यात आली आहेत. रुग्ण कमी होत असल्याने पालिकेने आता जम्बो कोरोना केंद्रे हटविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातच कानपूर आयआयटीच्या तज्ज्ञांनी जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कानपूर आयआयटीने चौथ्या लाटेचा इशारा दिल्याने पालिकेने आता सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता तातडीने कोरोना केंद्रे न हटविता याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती पालिकेने राज्याच्या कोरोना कृती दलाकडे केली आहे. ‘आयआयटीने वर्तवलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कृती दलाशी चर्चा करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरीक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
...
रुग्णदुपटीचा कालावधी ५,६४५
मुंबईतील कोरोना वाढीचा दर आता ०.०१ टक्क्यांवर आला आहे. तर, सध्या उपचार सुरू असलेल्या फक्त आठ टक्के रुग्णांमध्ये कोरोना सदृश लक्षणे आहेत. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५,६४५ दिवसांवर गेला आहे.
...
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..