Tue, March 28, 2023

विविध नागरी समस्यांविरोधात आम्ही खोपोलीकर संस्थेकडून धरणे आंदोलन.
पुण्यात ‘थर्टी फस्ट’पर्यंत थंडी वाढणार
Published on : 27 December 2021, 2:37 am
पुणे, ता. २७ : शहरातील थंडीचा कडाका गेल्या दोन दिवसांपासून कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने सोमवारी नोंदवले. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, ‘थर्टी फस्ट’पर्यंत थंडी वाढेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. शहरात गेल्या आठवड्यामध्ये ११ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली उतरला होता. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ असल्याने थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, येत्या चार ते पाच दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याने उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे शहरात पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ३१) किमान तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल. नवीन वर्षात किमान तापमानात आणखी घट होईल, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.