पूर्ण क्षमतेने बेडरोल मिळण्यास आणखी विलंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्ण क्षमतेने बेडरोल मिळण्यास आणखी विलंब
पूर्ण क्षमतेने बेडरोल मिळण्यास आणखी विलंब

पूर्ण क्षमतेने बेडरोल मिळण्यास आणखी विलंब

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना प्रवाशांना रेल्वे प्रवासात अनेक सुविधा पुरविल्या जात आहेत. यामध्ये बेडरोलची सुविधा सुरू केली. मात्र अद्याप पूर्ण क्षमतेने बेडरोलची सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांना डिस्पोजल बेडरोलवर अवलंबून राहावे लागत आहे. रेल्वेत पूर्ण क्षमतेचे बेडरोल सुरू होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कोरोना आणि लॉकडाऊन काळात बंद असलेले वॉशिंग प्लांट पुन्हा सुरू करण्यासाठी, सर्व बेडरोलचे सेट तयार करण्यासाठी रेल्वेला आणखीन दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक १२९५१ मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२९५३ ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२९२५ पश्चिम एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२९०३ गोल्डन टेम्पल या चार गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये डिस्पोजेबल बेडरोल देण्यात येत आहेत. तसेच ७ एप्रिलपासून प्रवाशांच्या सोयीसाठी राजधानी, विदर्भ एक्स्प्रेस, पंजाब मेल, एलटीटी -पुरी एक्स्प्रेस, लखनौ सुपरफास्ट, हबीबगंज एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमध्ये बेडरोल पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
...
डिस्पोजेबल बेडरोल मिळणार
कोरोना काळात बेडरोलची सुविधा बंद केली होती. या वेळी प्रवासी प्रवासात स्वतःच चादर, उशी, ब्लॅंकेटची व्यवस्था करत होते. या वेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर कोरोना काळात डिस्पोजेबल पेडरोल पुरविण्यात येत होते. या बेडरोलची किंमत ३०० रुपये होती. यात प्रवाशांसाठी ब्लॅँकेट, बेडशीट, कव्हर शीट, उशी अशा बाबी होत्या. आता प्रवाशांना रेल्वेद्वारे बेडरोल मिळत आहेत. मात्र तरीही डिस्पोजेबल बेडरोलची सुविधा कायम असणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
...
प्रत्येक ट्रेनच्या एका डब्यात साधारण ८० ते १२० बेडरोलची आवश्यकता असते; तर सरासरी संपूर्ण ट्रेनमध्ये एकूण ५०० बेडरोलची आवश्यकता असते. मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ४ लाख ७० हजार बेडरोलची आवश्यकता आहे. त्यापैकी सध्या १ लाख १४ हजार बेडरोल उपलब्ध आहेत, तर पश्चिम रेल्वेला ४ लाख ५० हजार बेडरोलची आवश्यकता आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार बेडरोलचा साठा आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..