कपडे धुण्यासाठी हायटेक लाँड्री!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : रुग्णालयांतील रुग्णांचे कपडे धुण्यासाठी मुंबई महापालिकेने अत्याधुनिक धुलाई केंद्र (लाँड्री) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात एकाच वेळी ३० हजार कपडे धुता येणार असून महापालिका यावर १६० कोटी रुपये खर्च करणार आहे. रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी अशा प्रकारे अत्याधुनिक केंद्र उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
सध्या महापालिका रुग्णालयांतील डॉक्टर, रुग्ण आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कपडे परळ तेथील विद्युत धुलाई केंद्रात धुतले जातात;. मात्र हे केंद्र आता जुने झाले असून त्याची क्षमताही कमी आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक कपडे बाहेरील खासगी केंद्रांवरून धुवून घेतले जातात. यामुळे पालिकेला मोठा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. यावर पर्याय म्हणून पालिकेने आता अत्याधुनिक टनेल लाँड्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हायटेक लाँड्री!
अत्याधुनिक धुलाई केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात ३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या केंद्रावर सायन, नायर, केईएम आणि कूपर रुग्णालयातील कपडे धुतले जाणार आहेत. तर इतर रुग्णालयांतील कपडे हे परळ येथील केंद्रांवर धुतले जातील. या केंद्रातून एकदाच कमी वेळेत कपडे धुवून त्यांचे निर्जंतुकीकरणही केले जाणार आहेत.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.