आपत्कालासाठी सुसज्जता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्कालासाठी सुसज्जता
आपत्कालासाठी सुसज्जता

आपत्कालासाठी सुसज्जता

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ :  आपत्कालीन परिस्थितीसाठी पालिका सुसज्ज होणार असून याची सुरुवात परळच्या केईएम रुग्णालयापासून होणार आहे. त्यानंतर इतर रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होईल.
रात्रीच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बेड आणि उपचार मिळण्यास अनेक अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन पालिकेने लवकरच आपत्कालीन व्यवस्था सुसज्ज आणि अडचणरहित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याची सुरुवात लवकरच परळच्या केईएम रुग्णालयापासून होणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यात येणार असून त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे पालिकेच्या मुख्य रुग्णालयांच्या संचालिका डॉ. नीलम अंद्राडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
पालिकेच्या सर्वच रुग्णालयांत आपत्कालीन विभाग असला, तरी रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आणि बेडबाबतच्या अडचणी कायमच असतात. त्यामुळे आपत्कालीन विभागासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
...
तीन शिफ्टमध्ये काम
- डॉ. नीलम अंद्राडे यांनी पुढे सांगितले की, रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर किती प्रमाणात इमर्जन्सी आहे, हे ठरवून तातडीने उपचार मिळावेत, यासाठी निवासी डॉक्टर, इंटेन्सिव्हिस, भूलतज्ज्ञ आणि अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज करण्यात येईल. ही टीम तीन शिफ्टमध्ये काम करील.
- या टीमचे मुख्य काम इमर्जन्सी केस ठरवणे, नियमावली लागू करणे असेल. या टीमला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर याची ट्रायल घेतली जाईल आणि मग याची सुरुवात होणार आहे.
- येत्या दोन आठवड्यात यासंदर्भातील परवानगीसाठी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली जाणार आहे.
- तसेच आपत्कालीन परिस्थितीत कसे काम करायचे, त्यासाठी केवळ मार्गदर्शन असेल. त्यामुळे मोठ्या प्रशिक्षणाची यात गरज भासणार नाही. त्यामुळे ज्या त्या रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर हे प्रशिक्षण देणार आहेत.
- रुग्ण आल्यानंतर पूर्ण माहिती घेऊन त्याला इमर्जन्सी सेवेची कितपत गरज आहे, हे डॉक्टर ठरवून उपचार करतील.
- सुरुवातीला प्रामुख्याने पालिकेच्या मुख्य केईएम रुग्णालयात याची सुरुवात होणार आहे त्यानंतर पुढील रुग्णालयात टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरू करण्यात येईल.
...
या रुग्णांना फायदा
रोड अपघात, मोठा हृदयविकाराचा झटका, इमारत दुर्घटना, स्ट्रोक, बर्न केस अशा प्रकारच्या रुग्णाला तातडीने उपचार मिळण्यास यामुळे मदत होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..