रेल्वेप्रवास अधिक सुकर

रेल्वेप्रवास अधिक सुकर

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : रेल्वेकडून प्रवाशांसाठी नवनव्या सुविधा राबवल्या जात असतात. आता मध्यवरेल्वेने क्युआर कोडच्या मदतीने एक्स्पेस गाड्यांतील प्रवाशांना मोबाईलवर आवश्यक माहिती देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुकर होणार आहे.
नव्याने रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता कोणत्याही बाबीची माहिती घेण्यासाठी दुसऱ्या प्रवाशावर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीच्या मदतीने एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचे नाव आहे ‘कन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह’ ज्यामध्ये प्रवाशांना मेल- एक्स्प्रेसच्या रेल्वे गाडीत एक क्युआर कोड उपलब्ध करून दिला आहे. हा क्युआर कोड प्रवाशांना मोबाईलवर स्कॅन केल्यावर एका चॅटबोर्डद्वारे प्रवास आणि प्रवासाची संपूर्ण माहिती मिळणार आहे.
मध्य रेल्वे प्रवासी केंद्रीत धोरण आणि नवीन उपक्रमांसाठी ओळखली जाते.  नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरासाठीची आवड लक्षात घेता प्रवासादरम्यान प्रवाशांना नवीन काळातील संवादात्मक अनुभव देण्यासाठी नॉन-फेअर रेव्हेन्यूअंतर्गत मध्य रेल्वेने भागीदारी केली आहे. ‘गुपशुप’च्या वापरातून मध्य रेल्वे प्रवास अधिक समृद्ध आणि आकर्षक अनुभवाचा व्हावा यासाठी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये  ‘कन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह’ उपक्रम सुरू केला आहे. यातील क्युआर कोड प्रवाशांनी आपल्या मोबाईलवर स्कॅन केल्यावर एक बुद्धिमान चॅटबोट सुरू होऊन त्याद्वारे प्रवास आणि प्रवासाची संपूर्ण माहिती मिळते. त्याशिवाय पुस्तके, हॉटेल, गेम्स यांसारख्या अनेक सेवांचा आनंद प्रवाशांना घेता येतो. सध्या ‘कन्व्हर्सेशन ऑन द मूव्ह’ उपक्रमाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने आणखी एका एक्स्प्रेस गाडीमध्ये हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
...
चॅटबोट खजिना...
चॅटबोटद्वारे तुमच्या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकांचे सखोल तपशील मिळवू शकतात. या तपशिलांमध्ये भेट देण्याची ठिकाणे, खरेदी, जेवण, कपडे, स्मृतिचिन्ह आणि बरेच काही समाविष्ट आहे. याशिवाय या चॅटबोटमध्ये  प्रेमकथा, विशेषत: पौराणिक कथा, रामायण, महाभारत आणि इतर लोककथांमधील छोट्या न ऐकलेल्या कथा याद्वारे समजतात. या सर्व गोष्टींसाठी, चॅटबोट तुमच्या आवडीच्या भाषेत वापरता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com