
सल्लागारांच्या अहवालाअभावी रस्त्यांच्या कामाची रखडपट्टी
मुंबई, ता. २४ : रस्त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु या सल्लागाराकडून कुठल्याही प्रकारचा अहवाल आला नसल्यामुळे रस्त्यांची कामे रखडल्याचा आरोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. या संदर्भात रवी राजा यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना लक्ष घालण्याची विनंती केली.
डिसेंबर, जानेवारी महिन्यात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. पुढे कार्यादेश जारी करून रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार होते. काही ठिकाणी डक्ट पद्धतीचा वापर करून जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिनी, केबल लाईन टाकण्यात येणार होती. त्यासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली होती; परंतु या सल्लागाराकडून आतापर्यंत अहवालच दिला नसल्याने कामाला सुरुवात झाली नाही. सल्लागाराच्या दिरंगाईमुळे रस्त्यांच्या कामांना निलंब झाल्याचा आरोपही रवी राजा यांनी केला.
---
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..