नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे वळत आहेत जिल्ह्यातील शेतकरी, जिल्हा परिषदेचाही अनुदानासाठी पुढाकार (राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे वळत आहेत जिल्ह्यातील शेतकरी, जिल्हा परिषदेचाही अनुदानासाठी पुढाकार (राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने)
नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे वळत आहेत जिल्ह्यातील शेतकरी, जिल्हा परिषदेचाही अनुदानासाठी पुढाकार (राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने)

नाविन्यपूर्ण पिके घेण्याकडे वळत आहेत जिल्ह्यातील शेतकरी, जिल्हा परिषदेचाही अनुदानासाठी पुढाकार (राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने)

sakal_logo
By
(केपी.................) ------------------ राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष ........... नावीन्यपूर्ण पिकांची शेतकऱ्यांना भुरळ जिल्हा परिषदेचाही अनुदानासाठी पुढाकार सुनील पाटकर : सकाळ वृत्तसेवा महाड, ता. २२ : पारंपरिक भात शेतीच्या पलीकडे जाऊन शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याबरोबरच नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याकडे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये हळद, ड्रॅगन फ्रूट, ऊस आदी पिकांचा समावेश आहे. रायगड जिल्हा परिषदेनेही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला असून अनुदान दिले आहे. रायगड जिल्ह्याची ओळख भाताचे कोठार म्हणून होती; परंतु सातत्याने निर्माण होणारे वातावरणातील बदल, चक्रीवादळ, पूरपरिस्थितीमुळे भातशेती अडचणीत येत आहे. औद्योगीकरणही शेतीच्या मुळावर आहे. या बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात शेतीसह इतर नावीन्यपूर्ण शेतीकडे मोर्चा वळवला. अशा पिकांमधून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. रोहा, मुरूड, अलिबाग या परिसरामध्ये फूल शेतीचा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. इंदापूर, माणगाव परिसरामध्ये ड्रॅगन फ्रूट लागवड शेतकऱ्यांनी यशस्वीपणे करून दाखवली आहे. महाड आणि पाली परिसरात शेतकऱ्यांनी हळद लागवड करून शेतीचा नवीन मार्ग चोखाळला आहे. महाडमधील अनिल काते, मोहम्मद अली झमाने, गणेश मिसाळ, जयेश लामजे, विठ्ठल लामजे यांनी हळदीची लागवड यशस्वी केली आहे. त्यांनी आल्याचे देखील पीक घेतले आहे. मधुकर निकम या शेतकऱ्यांनी एक एकरमध्ये उसाचे पीक घेऊन कोकणातही ऊस पिकतो, हे सिद्ध केले. अशा प्रकारची नावीन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शेती विभागाने पाच लाखांची तरतूद केली आहे. यातून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जिल्हा परिषद देते. यंदा जिल्ह्यातील शंभर शेतकऱ्यांना अशा प्रकारचे अनुदान दिले जाणार आहे. यासाठी किमान दहा गुंठ्यांवर तरी शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण पीक घेतले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचा अशी पिके घेण्याकडे कल वाढू लागला आहे. .... सुमारे ४०० शेतकऱ्यांचा वसा महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या पोलादपूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. केळी, झेंडूची फुले, कोरफड, पपई, सोयाबीन अशा लागवडीचे प्रयोग अनेक शेतकरी करू लागले आहेत. सुमारे ४०० शेतकरी अशी विविध पिके घेत असतात. ............... रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता भाताव्यतिरिक्त अन्य नावीन्यपूर्ण पिके घेऊ लागले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनीही घ्यावा, यासाठी अशा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. - लक्ष्मण खुरकुटे, जिल्हा कृषी अधिकारी. ....... भाताव्यतिरिक्त आता इतर शेतीचे प्रयोग करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू लागले आहेत. बदलत्या काळानुसार व हवामानानुसार असे प्रयोग करणे आता गरजेचे झाले आहे. - टी. एस. देशमुख, अध्यक्ष, किसान क्रांती संघटना.