कोथुर्डे ग्रामस्थांचा क्रशरला विरोध
गावातील घरांचे नुकसान होण्याची भीती
महाड, ता.१२ (बातमीदार) : महाड ते रायगड या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिलेल्या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी लागणारी खडी, दगडांसाठी कोथुर्डे गावामध्ये सुरू करण्यात येत असलेल्या क्रशरला येथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कोथुर्डे ग्रामस्थांनी या बाबतचे निवेदन महाडचे तहसीलदार सुरेश काशिद यांना दिले.
महाड-रायगड या रस्त्याचे महामार्गमध्ये रूपांतर झाल्याने आता रस्त्याचे काम सुरू करण्यात येत आहे. यासाठी खडी, दगड लागणार असून संबंधित ठेकेदाराने कोथुर्डे गावात क्रशरसाठी जागा घेतली आहे. त्या जागेवर करण्यात येणारे स्फोट गावातील घरांना हादरा बसू शकतात. त्याचप्रमाणे या हादऱ्यामुळे कोथुर्डे धरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करीत कोथुर्डे ग्रामस्थांनी या जागेला विरोध केला. याबाबतचे निवेदन सुरेश काशिद यांना दिले.
कोथुर्डे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर १८२/१५ व १८२/१८ या क्षेत्रामध्ये क्रशरसाठी जागा घेतली आहे. हे ठिकाण हे कोथुर्डे मुळ गावठाणापासून अर्धा ते पाऊण किलोमीटरवर आहे. त्या
कोथुर्डे धरणावर महाडसह सुमारे १२ गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. तरी ही परवानगी दिल्यास पुढील हानीस सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देण्यासाठी काँग्रेसचे महाड तालुका अध्यक्ष राजेंद्र कोरपे, माजी सरपंच मारुती सुतार, पोलिस पाटील विलास पाटील, राम सुतार, दत्ताराम सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.