१५ एप्रिलपासून दोन दिवस शिवपुण्यतिथी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ एप्रिलपासून दोन दिवस शिवपुण्यतिथी कार्यक्रम
१५ एप्रिलपासून दोन दिवस शिवपुण्यतिथी कार्यक्रम

१५ एप्रिलपासून दोन दिवस शिवपुण्यतिथी कार्यक्रम

sakal_logo
By

महाड, ता. ७ (बातमीदार) : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या पुण्यतिथीनिमित्त १५ आणि १६ एप्रिलला रायगडावर विविध कार्यक्रम होणार आहेत. यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया हे उपस्थित राहणार आहेत. या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने १५ एप्रिलला सायंकाळी सात वाजता राज दरबारात सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांच्या मुलाखती आणि शाहिरी कार्यक्रम ‘ही रात्र शाहिरांची’ आणि श्री जगदीश्वर मंदिरात हरिजागर होणार आहे. दुसऱ्या दिवशी १६ एप्रिलला मुख्य कार्यक्रम असून पहाटे पाच वाजता श्री जगदीश्वर पूजा, सकाळी सहा वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी आठ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, सकाळी नऊ वाजता राजदरबार येथे श्री शिव प्रतिमा पूजन, छत्रपती शिवरायांना आदरांजली आणि छत्रपतींच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक हे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिविशिष्ट सेवा मेडल व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांचे वंशज समस्त मालुसरे घराणे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. छत्रपतींना आदरांजली वाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..