
उष्माघाताचा पशुपक्षांनाही त्रास,घुबड आणि घारीवर उपचार
महाड, ता.२३ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा अनेक ठिकाणी ४१ अंश सेल्सिअरपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे पशू-पक्षी बेजार झाले आहेत. अशाच उष्माघाताचा त्रास झालेल्या घुबडावर आणि घारीवर महाड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपचार करून त्यांना जीवदान दिले.
तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील अनेक पाण्याचे स्रोत आटल्याने पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. यातूनच त्यांना उष्माघाताला सामोरे जावे लागते.
महाडमध्ये असा उष्माघाताचा त्रास झालेले एक घुबड आणि एक घार भोवळ येऊन पडलेली वन विभाग अधिकाऱ्यांना आढळून आली होती. वन विभागाने या पक्ष्यांची सुटका करून कार्यालयात आश्रयाला ठेवले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये हे दोन्ही पक्षी ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकृती सुधारत असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राकेश साहू यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..