कर्जत बातमी  ---------- दुर्गजागर प्रतिष्ठान व हुतात्मा हिराजी पाटील फाऊंडेशनकडून रक्तदान शिबीर

कर्जत बातमी ---------- दुर्गजागर प्रतिष्ठान व हुतात्मा हिराजी पाटील फाऊंडेशनकडून रक्तदान शिबीर

कर्जतमध्ये रक्तदान शिबीर कर्जत, ता. ५ (बातमीदार) ः हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनानिमित्त दुर्गजागर प्रतिष्ठान व हुतात्मा हिराजी पाटील फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीरासाठी एम. जी. एम. ब्लड बँक पनवेल कामोठे या ब्लड बँकेला निमंत्रित करण्यात आले होते. ७० तरुणांनी यावेळी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन आगरी युवा संघटनेचे अध्यक्ष नितीन धुळे, अशोक डुकरे या मान्यवरांच्या हस्ते झाले. याचबरोबर दुर्गजागर प्रतिष्ठाने संस्थापक संतोष जगताप, हुतात्मा हिराजी पाटील फाऊंडेशनचे संस्थापक संतोष शेळके, रायगड विभागप्रमुख प्रविण भोईर, संजय शिंदे, किरण थोरात आदि उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com