ग्रामपंचायत प्रभाग रचनेच्या
कार्यक्रमाला स्थगिती
अलिबाग, ता. ७ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २६२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता; परंतु ग्रामपंचायतीमधील प्रारूप प्रभाग रचना आणि आरक्षणामध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत उरण तालुक्यातील १८, रोहा पाच, म्हसळा १३, सुधागड १४, महाड ७४, अलिबाग नऊ, तळा एक, पनवेल १२, पेण २७, पोलादपूर २०, खालापूर १८, मुरूड पाच, श्रीवर्धन १५ कर्जत नऊ तसेच माणगाव २२ या ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. एप्रिल व सप्टेंबरच्या दरम्यान दोन टप्प्यांमध्ये निवडणुका होणार होत्या, परंतु तूर्तास या प्रभाग रचनेचा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
----------------------------------
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता; परंतु तूर्तास या कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे. सरकार जे आदेश देतील त्याचे पालन करून प्रकिया राबविली जाईल.
- महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड.