मुंबई
कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढली
दररोज दीड हजार नवीन रुग्ण
आरोग्य विभागासमोर आव्हान
प्रमोद जाधव : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : रायगड जिल्ह्याला नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याचे दिसते. एक डिसेंबरला एका दिवसात २८४ रुग्ण सापडले होते. ही संख्या ८ डिसेंबरला एक हजार ५२१ रुग्ण झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत अवघे ४० ते ५० रुग्ण सापडत होते. ही संख्या नवीन वर्षात झपाट्याने वाढू लागली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचे हे संकेत आहेत. सध्या एका दिवसात एक हजार ते दीड हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या तिपटीने अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची तारांबळ उडू लागली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत स्तरावर कोरोना विरोधात जनजागृती सुरू केली आहे. मास्क वापरणे बंधनकारक केले असून सोशल डिस्टंन्सिंग राखण्यावर भर देण्यात आला आहे. रायगड पोलिस दलाकडूनही विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
......
जानेवारीतील कोरोना रुग्ण संख्येवर दृष्टिक्षेप
तारीख - नवीन रुग्ण
१-१९६
२ - २८४
३ - ३१४
४ - ७०२
५ - ७४९
६ - १०९६
७ - १७१४
८ - १५२१
.....
१५ वर्षांवरील ४४, १९४ मुलांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनुसार तीन जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे जिल्ह्यातील २४ केंद्रामध्ये लसीकरण सुरू केले आहे. या गटातील मुलांची संख्या एक लाख ४५ हजार ३८३ आहे. आतापर्यंत ४४ हजार १९४ मुलांचे लसीकरण झाले आहे.
.......
तालुकास्तरावर स्वतंत्र पथके होणार स्थापन
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संशयित व त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचणीचे निष्कर्ष मिळण्यासाठी ५ ते ८ तासांचा कालावधी लागत आहे. त्याचा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांची आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरित तपासणी करून त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. रॅपिड अॅंटिजेन टेस्टसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथक तयार करण्यात आवश्यक आहेत. पथकाद्वारे पंचायत समिती, तहसील कार्यालयांसह, इतर सरकारी कार्यालय व मोठ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये रॅपिड अॅटिजेन टेस्ट करण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
….
आठ दिवसांत पाच जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यामध्ये सहा हजार ४८५ बाधित रुग्ण आहेत. यातील ३४६ रुग्ण जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये दाखल आहेत. त्यात जनरल बेडवर २९३, ऑक्सिजनवर २३, आयसीयूमध्ये २८, व्हेंटीलेटरवर एक रुग्णांचा समावेश आहे. एक ते आठ जानेवारी या कालावधीत कोरोना रुग्ण संख्या वाढत असली, तरीही मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. या आठ दिवसांत पाच जणांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.