पोलिसांसोबत हुज्जत घालणे पडले महागात,

पोलिसांसोबत हुज्जत घालणे पडले महागात,
Published on
पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात न्यायालयाने ठोठावला पाच हजारांचा दंड पाली, ता. १३ (वार्ताहर) : पालीमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान वाहनचालकांची कागदपत्रे व परवाना तपासला जात आहे. या वेळी एका नागरिकाने पोलिसांना सहकार्य न करता पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पाली न्यायालयाने या व्यक्तीला पाच हजाराचा दंड ठोठावला, अशी माहिती गुरुवारी (ता. १३) पाली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी दिली. पाली-खोपोली रस्त्यावर गणेश हॉटेलजवळ बिरप्पा कलप्पा पुजारी (वय ३८) हा वाहन परवाना नसताना मोटरसायकल चालवत असताना आढळून आला. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. याप्रकरणी पोलिस हवालदार ज्ञानेश्वर जाधव यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाली यांच्यासमोर हजर केले. या वेळी न्यायालयाने पुजारी याला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
Mumbai-Pune Highway Traffic News
Palsadari-Khopoli Mega Block
मॉडेलिंग करणाऱया तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी विवाहित प्रियकरावर गुन्हा दाखल!   पत्नीचा दर्जा न देता शारीरिक व मानसिक छळ करुन पैशांसाठी मारहाण केल्याचा आरोप
Marathi News Esakal
www.esakal.com