रायगडमध्ये १ लाख ८२ हजार बालकांना पोलिओ डोस देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगडमध्ये १ लाख ८२ हजार बालकांना पोलिओ डोस देणार
रायगडमध्ये १ लाख ८२ हजार बालकांना पोलिओ डोस देणार

रायगडमध्ये १ लाख ८२ हजार बालकांना पोलिओ डोस देणार

sakal_logo
By

अलिबाग, ता. २४ : रायगड जिल्ह्यात रविवारी (ता. २७) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या एक लाख ८२ हजार २८९ बालकांना दोन हजार ५२५ बुथवर पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एक लाख ८२ हजार २८९ बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात दोन हजार ३८२ आणि शहरी भागात १४३ असे एकूण दोन हजार ५२५ बुथवर लशीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त बस डेपो, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणीसुद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी पाच हजार ६४७ आरोग्य कर्मचाऱ्यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून, अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खासगी संस्थांचादेखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे. पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओसारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लशीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top