एसटी संपामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची पायपीट; केंद्रावर पोचण्यासाठी धावपळ

ST Strike
ST Strikesakal media
Published on

अलिबाग : बारावीची परीक्षा (hsc exam) सुरू झाली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रायगड जिल्ह्यात (Raigad) एसटी सेवा मंदावली असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागते. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. कोरोना परिस्थिती (corona pandemic) आणि एसटीचा संप (ST bus strike) लक्षात घेऊन शिक्षण विभागाने बारावी परीक्षा केंद्रात (exam center) वाढ केली असली तरीही जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना केंद्रावर पोचण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते.

ST Strike
सायबर क्राईमचे बळी होऊ नका! मुंबई सायबर सेलचे आवाहन

पोलादपूर, श्रीवर्धन आणि म्हसळा यांसारख्या तालुक्यांमधील नागरिकांना दळण-वळणासाठी एसटी हाच पर्याय आहे. संपामुळे या भागातील अंतर्गत वाहतूक अद्याप खंडित आहे. खासगी वाहनाने करावा लागणारा प्रवास खर्च न परवडणारा आहे. विद्यार्थ्यांना हा न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. या संदर्भात म्हसळा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली.

आर्थिक भुर्दंड

विद्यार्थ्यांना गावापासून जवळच्या केंद्रावर बारावीची परीक्षा देता यावी, यासाठी केंद्रांची संख्या १९० पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये हा यामागील उद्देश आहे. मात्र, काही ग्रामीण भागात प्रवासाची सुविधा नसल्यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक पैसे द्यावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

mumbai local
What is the Valdhuni Buddha Bhoomi project?
medical student controversial remarks in comedy show
Shaktipeeth Expressway Project Gains Momentum; Notification for Land Acquisition Soon
Marathi News Esakal
www.esakal.com