
सुधागड तालुका कुपोषण मुक्तीच्या दिशेने
पाली, ता. ८ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यात बालकांच्या प्रमाणात ४० टक्के घट झाली आहे. प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या प्रभावी योगदानामुळे तालुका कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करत आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागाच्या ऑक्टोंबर २०२१ महिन्याच्या अहवालानुसार सुधागड तालुक्यात एकूण १४ अतितीव्र व ७१ मध्यम तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली होती; मात्र फेब्रुवारी २०२२ अखेरपर्यंत तालुक्यात आठ अतितीव्र व ४१ मध्यम तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. तालुक्यात सरकारी योजना व स्वदेश फाऊंडेशन, अन्नदा, प्राईड इंडिया अशा अनेक संस्थांमार्फत तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे कुपोषित बालकांच्या वजनात वाढ होत असून तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचे सुधागड तालुका प्रभारी प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
....
कुपोषणमुक्तीसाठी उपाय
कुपोषणमुक्तीसाठी आनंदा संस्था व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सहा महिने ते सहा वर्षांखालील बालकांना २१ जानेवारी २०२२ ते २१ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत एकूण ३ हजार ६०१ बालकांसाठी अन्न पोषण पोटली वाटप मोहीम राबविण्यात आली. तसेच कोरोना संकटामध्ये कोणी उपाशी झोपू नये, यासाठी तालुक्यातील गरजू आणि आदिवासी बांधवांना २४.१ टन रेडी टू कुक आणि ‘रेडी टू इट रेशन’ वितरण करण्यात आले. याचबरोबर भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड व अन्नदान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ३६ अंगणवाडी केंद्रातील ८४० लाभार्थ्यांना जानेवारी २०२२ पासून ते जून २०२२ पर्यंत असे एकूण ६ महिने सोया लाडू, माका लाडू, गहू लाडू अशा तीन पॅकेजचा एक किट प्रत्येक महिन्यामध्ये लाभार्थ्यांना वाटप करण्याचा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..