crime news
crime newsSakal media

कर्जत : महिलेचा विनयभंग करणाऱ्याला केरळमधून अटक

कर्जत : महिलेचा विनयभंग (Woman Molestation) करणाऱ्या आरोपीचा कर्जत रेल्वे पोलिसांनी (Karjat railway police) केरळमध्ये (Keral) जाऊन बेड्या ठोकल्या. जयंता जयदेब गांगुली असे या आरोपीचे नाव (culprit arrested) असून त्याने कर्जत रेल्वे स्थानकात रात्री साडेआठच्या सुमारात एका महिलेचा विनयभंग केला होता. पीडित महिलेने कर्जत रेल्वे पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीचा (CCTV) आणि खबरींचा आधार घेत आरोपीचा शोध घेतला.

crime news
ST Strike : ''आंदोलनाआधी पवारांच्या घराची रेकी करण्यात आली''

या वेळी आरोपी जयंता गांगुली हा कोझिकोड- केरळला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुन्हे तपास पथकातील पोलिस अमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल ठोंबरे, पोलिस हवालदार ज्ञानेश्‍वर पाटील व अन्य पोलिसांनी आरोपीच्या राहात्या पत्त्यावर केरळला जाऊन शोध घेतला. आणि तेथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com