Thur, June 8, 2023

जान्हवी, अनन्याला मी माझी स्पर्धक मानत नाही - सारा अली खान
जान्हवी, अनन्याला मी माझी स्पर्धक मानत नाही - सारा अली खान
Published on : 22 December 2021, 11:48 am
जान्हवी, अनन्याला मी माझी स्पर्धक मानत नाही - सारा अली खान
अभिनेत्री सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. त्यामुळे तिच्यासोबतच बॉलिवूड पदार्पण केलेल्या जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या अभिनेत्रींच्या तुलनेत आपल्या करिअरमध्ये ती खूपच पुढे गेली आहे. अशात आता नुकत्याच एका मुलाखतीत साराने, जान्हवी आणि अनन्याला आपण स्पर्धक मानत नाही असे वक्तव्य करत त्यासोबतच त्याचे कारणही सांगितले आहे. सारा म्हणाली, ‘मी माझ्या जागेवर आरामात आहे तर मग मला असुरक्षित का वाटायला हवे. आम्हा सर्वांमध्ये स्पर्धा नक्कीच आहे. मात्र आम्ही सर्व एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहोत आणि आमचे बॉन्डिंग एवढे चांगले आहे की कामातील स्पर्धेचा त्यावर काहीच फरक पडणार नाही. स्पर्धा असली तरीही जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल, तुम्ही सत्याच्या रस्त्यावर चालत असाल तर तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही.’