Sat, March 25, 2023

पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया पुन्हा एकदा एकत्र
पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया पुन्हा एकदा एकत्र
Published on : 22 December 2021, 11:16 am
(केपी.................)
------------------
पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया पुन्हा एकदा एकत्र
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी सौरभ शुक्ला दिग्दर्शित '' जब खुली किताब '' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट सौरभ शुक्ला यांच्या नाटकाचे रूपांतर आहे. यापूर्वी पंकज आणि डिंपल २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ''फाईडिंग फैनी'' चित्रपटात दिसले होते.
या चित्रपटाच्या कथेमध्ये पंकज आणि डिंपल हे जोडपे वयाच्या ५० व्या वर्षी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयाचा नातेसंबंधाचा त्यांच्या कुटुंबावर कसा परिणाम होतो हे यामध्ये दाखवले आहे. हे संपूर्ण नाट्य अतिशय गमतीशीर पद्धतीने दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग उत्तराखंडमध्ये होणार आहे. या चित्रपटात पंकज कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबत अपारशक्ती खुराना, समीर सोनी आणि नौहीद सायरुसी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता सौरभ शुक्ला यांनी सांगितले, हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि पंकज व डिंपल यांच्यासारख्या कलाकारांसोबत तो बनवण्यास मी उत्सुक आहे. हा चित्रपट २०२२ मध्येच प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.