Wed, March 29, 2023

मोफत लसीकरण शिबिरात जेष्ठ नागरिकांसह,विशेष मुलांनी घेतला लाभ..
मोफत लसीकरण शिबिरात जेष्ठ नागरिकांसह, विशेष मुलांनी घेतला लाभ
Published on : 22 December 2021, 3:43 pm
कांदिवली : कांदिवली पश्चिम (Kandivali West) येथील श्री साई सेवा मंडळाच्या वतीने संस्थापक कै. अरुण पाटील यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्ताने मोफत लसीकरण शिबिराचे (Free vaccination drive) आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता. २२) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत १६२ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
श्री साई सेवा मंडळ आणि डहाणूकरवाडी पालिका आरोग्य केंद्राच्या वतीने कांदिवली गावठाण येथील साई मंदिराच्या आवारात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेष, दिव्यांग मुलांनाही या वेळी लस देण्यात आली. डॉ. अमोल चव्हाण, डॉ. नमिता सरोळकर, परिचारिका रश्मी शिंदे, प्रभावती पुजारी यांच्यासह साई सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी नियमांचे पालन करून शिबिर पार पाडले.