साकिनाका पोलिसांचा जीव धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकिनाका पोलिसांचा जीव धोक्यात
साकिनाका पोलिसांचा जीव धोक्यात

साकिनाका पोलिसांचा जीव धोक्यात

sakal_logo
By
ओके...बेलवाडकर... ------------------- साकीनाका पोलिसांचा जीव धोक्यात इमारतीची पडझड; आधाराला लोखंडाचा टेकू नीलेश मोरे : सकाळ वृत्तसेवा घाटकोपर, ता. २२ : ‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद जोपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी खाकी वर्दीतील पोलिस दिवस-रात्र पहारा देतात; मात्र याच खाकी वर्दीतील पोलिसांवर जीव धोक्यात घालून काम करण्याची वेळ साकीनाका येथे आली आहे. साकीनाका पोलिस ठाण्याच्या इमारतीला तडे गेले आहेत. भिंतींच्या प्लास्टरची पडझड होत असून इमारतीला आधारासाठी लोखंडाचा टेकू देण्यात आल्याने पोलिसांचा जीव टांगणीला आला आहे. साकीनाका चांदीवली परिसरात असलेली चारमजली इमारत ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. या संपूर्ण इमारतीचे प्लास्टर कोसळत आहे. छतावरील सिमेंटदेखील निखळत असल्याने लोखंडी सळ्या दिसत आहेत. इमारतीच्या आधारासाठी गेल्या काही महिन्यांपासून लोखंडाचा टेकू देण्यात आला आहे. पालिकेच्या एल प्रभागामध्ये ही इमारत आहे. पालिकेने ती धोकादायकही ठरवली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या इमारतीची पाहणी करून पुनर्बांधणीसाठी नारळ वाढवून भूमिपूजन केले होते; मात्र अद्याप नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात झाली नाही. साकीनाका पोलिस ठाण्यात एकूण २५० ते ३०० पोलिस अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु आम्हाला प्रत्येक दिवसाची सुरुवात मनात भीती बाळगून करावी लागते, असे एका पोलिसाने खासगीत सांगितले; तर या इमारतीबाबत एल प्रभागाचे सहायक आयुक्त ससाणे व स्थानिक आमदार दिलीप लांडे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. फोटो : साकीनाका पोलिस ठाण्याच्या इमारतीची काही क्षणचित्रे. (छायाचित्र : नीलेश मोरे)