१५ जानेवारीपर्यंत वाढीव गुणांचे प्रस्ताव देता येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ जानेवारीपर्यंत वाढीव गुणांचे प्रस्ताव देता येणार
१५ जानेवारीपर्यंत वाढीव गुणांचे प्रस्ताव देता येणार

१५ जानेवारीपर्यंत वाढीव गुणांचे प्रस्ताव देता येणार

sakal_logo
By
१५ जानेवारीपर्यंत वाढीव गुणांचे प्रस्ताव देता येणार मुंबई, ता. २२ : दहावी, बारावीत शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला यामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करण्यास शाळांना १५ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास शाळांना नोटिसा बजावल्या जातील, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. लोककला प्रकारात राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला अतिरिक्त १५ गुण मिळणार असून रौप्य आणि कास्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे १० आणि पाच गुण देण्यात येणार आहेत. चित्रकला प्रकारात इंटरमिजीएट परीक्षेत ग्रेड अ असलेल्या विद्यार्थ्याला सात गुण, ग्रेड बी विद्यार्थ्याला पाच गुण आणि ग्रेड सी असलेल्या विद्यार्थ्याला तीन गुण दिले जाणार आहेत. चित्रकला विषयातील वाढीव गुण मिळण्यासाठी विद्यार्थ्याने एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पाश्चात्य नृत्य प्रकारासाठी या गुणांची सवलत मिळणार नाही, असे मंडळाने सांगितले आहे. तसेच, शाळांनी पात्र विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव पोस्टाने पाठवू नये, त्याऐवजी आपापल्या विभागातील मंडळांकडे प्रत्यक्ष हे प्रस्ताव सादर करावेत, अशी सूचनाही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.