प्रीती झिंटाने बाल्कनीमध्ये फुलवली केळ्याची बाग!
मुंबई : प्रीती झिंटाने (Preity Zinta) बाल्कनीमध्ये फुलवली केळ्याची बाग (Banana Garden) बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रीतीने आता एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्रीने २०१९ पासून आपल्या घरीच शेती करत असल्याचं सांगितलं होतं. आता प्रितीने इन्स्टाग्राम अकाउंटवरून (instagram) ''घर की खेती'' नावाचा व्हिडिओ शेअर (video about farming) केला आहे. या व्हिडिओमध्ये ती केळीचे गुच्छ दाखवत आहे आणि तीन वर्षांपूर्वीच्या तिच्या लागवडीबद्दल सांगत आहे. ( Banana farming in Preity zinta house video on Instagram)
प्रितीने व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले की, ''घरची शेती. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही मुलांसोबत घरी होतो. आम्ही आमच्या सर्व योजना, प्रवास आणि कार्यक्रम पुढे ढकलले. या झाडांना वाढताना पाहणं, त्यांची भरभराट होताना पाहणं याहून मोठा आनंद दुसरा कोणताच नव्हता. मी फार आनंदी आहे की मला हे तुमच्या सर्वांसोबत शेअर करता आले.
जेणेकरून संयमाचे फळ गोड असते हे तुम्हा सर्वांना दिसेल. जर तुम्ही कोणतंही रोप लावलं आणि त्याला प्रेम आणि काळजी दिली तर ते नक्कीच या केळीच्या झाडासारखे वाढेल आणि फळ देईल. झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश तिने दिला. तिच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.