नवनिर्माण समाज विकास केंद्रातर्फे जागतिक ग्राहक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवनिर्माण समाज विकास केंद्रातर्फे जागतिक ग्राहक दिन
नवनिर्माण समाज विकास केंद्रातर्फे जागतिक ग्राहक दिन

नवनिर्माण समाज विकास केंद्रातर्फे जागतिक ग्राहक दिन

sakal_logo
By
कांदिवलीत जागतिक ग्राहक दिन मालाड, ता. २५ (वार्ताहर) ः कांदिवलीच्या दामूनगर येथील नालंदा बुद्धविहारात नवनिर्माण समाज विकास केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. या वेळी मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे, नवनिर्माण समाज विकास केंद्र या संस्थेचे ट्रस्टी मनोहर राजगुरू, धनश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मार्गदर्शन करताना प्राधिकरणाचे सचिव सतीश हिवाळे म्हणाले की, कोणत्याही प्रकाराच्या फसवणुकीबाबत मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे लेखी अर्ज करू शकता; मात्र हे करताना आपल्याकडे योग्य ती कागदपत्रे असली पाहिजेत. कोणतीही वस्तू खरेदी करताना पावती घेणे आवश्यक असून वस्तूची समाप्ती तारीख बघणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. धनश्री जाधव यांनी नवनिर्माण संस्थेची माहिती उपस्थितांना दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..