फायटरमध्ये अनिल कपूरची वर्णी
अभिनेते अनिल कपूर बॉलिवूडचे असे अभिनेते आहेत, ज्यांच्यावर वाढत्या वयाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. वयाच्या साठीतही त्यांच्यात यंगस्टर्सप्रमाणे एनर्जी आहे. अनिल कपूर यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना त्यांनी गुड न्यूज दिली आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या आगामी फायटर चित्रपटात आता त्यांची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत.
अनिल कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली. अनिल कपूर यांनी सिद्धार्थ आनंद आणि हृतिक सोबतचा फोटो शेअर केला आहे. यासह त्यांनी संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा आनंद आणि उत्साह व्यक्त केला आहे. संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. दीपिका, हृतिक आणि अनिल कपूर हे तिन्ही कलाकार मिळून बॉक्स ऑफिसवर धमाल करणार हे नक्की. फायटर चित्रपटात अनिल कपूर यांची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. तसेच भारतातली ही पहिली एरिअल अॅक्शन फिल्म असणार आहे. या चित्रपटासाठी जगभरातील ठराविक लोकेशन्स सीलेक्ट करून शॉट्स घेतले जाणार असल्याचं बोललं जातंय.