राज्यात वर्षभरात घर विक्रीने घेतले लाखांचे उड्डाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात वर्षभरात घर विक्रीने घेतले लाखांचे उड्डाण
राज्यात वर्षभरात घर विक्रीने घेतले लाखांचे उड्डाण

राज्यात वर्षभरात घर विक्रीने घेतले लाखांचे उड्डाण

sakal_logo
By
घरविक्रीने घेतले लाखांचे उड्डाण राज्यात मार्च महिन्यात सर्वाधिक व्यवहार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच यंदा राज्यात घरविक्रीला मात्र ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या वर्षात राज्यात तब्बल १५ लाख ११ हजार ९८४ घरांची विक्री झाली, तर मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजे २ लाख १३ हजार ४७६ घरांची विक्री झाली. तसेच मुंबईमध्ये १ लाख ११ हजार ८४५ घरांची विक्री झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला होता. गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्केची सूट दिली. या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात घरखरेदी झाली. त्यामुळे विकसकांनी मुदत संपुष्ठात येताच सवलतीला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे राज्य सरकारने १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्काचा तीन टक्के दर लागू केला. मुद्रांक शुल्कात सवलत आल्याने ग्राहकांनी मोठ्या रकमेची घरखरेदी करण्यावर भर दिला. .... विक्रीमधील चढउतार नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात १ लाख ५१ हजार १५५ घरांची राज्यात विक्री झाली. फेब्रुवारीमध्ये १ लाख ५१ हजार १५५, मार्च महिन्यात २ लाख १३ हजार ४७६, एप्रिल महिन्यात ९४ हजार ८४४, मे महिन्यात ६६ हजार ६३१, जून महिन्यात १ लाख ४५ हजार ५२६, जुलै महिन्यात १ लाख ३६ हजार ४५९, ऑगस्ट महिन्यात १ लाख ०५ हजार ५९८, सप्टेंबरमध्ये ९७ हजार ८८२, ऑक्टोबरमध्ये १ लाख ६ हजार ९८६, नोव्हेंबरमध्ये १ लाख ०४ हजार १४ आणि डिसेंबरमध्ये १ लाख ३७ हजार ००५ घरांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top