चैत्राची ‘पुकार’

चैत्राची ‘पुकार’
चैत्राची ‘पुकार’ नवी मुंबईतील चैत्रा यादवरने कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ‘पुकार कोविड रिलीफ’ ही संस्था सुरू केली. ज्यांना जगण्यासाठी दोन वेळचे अन्नही मिळू शकत नाही, अशांसाठी चैत्राने प्रणित राव यांच्यासोबत काम सुरू केले. त्यासाठी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना जोडले आणि त्यांची मदत मोहल्ल्यापासून गल्ल्यांपर्यंत पोहचली. ज्या स्त्रिया अत्यंत कमी उत्पन्न गटातील आहेत, ज्या सरकारी मदतीपासूनही वंचित आहेत, ज्या स्त्रियांचा भाकर आणि भूक याच्याशी ताळमेळ होत नाही, अशा बायकांना ‘पुकार मोहिमें’तर्गत चैत्रा यांनी मदत केली आहे, अजूनही त्या मदत करत आहे. गेल्या वर्षी स्थलांतरित कामगारांच्या २० गटांना सतत सहा-सात महिने ‘पुकार’ने अन्नधान्य पुरवले. रोजंदारीवर काम करणारे अनेक कामगार गावाकडे जाण्यासाठी तिकीट नसल्याने महामुंबईत अडकले होते. जे गावाकडे चालत किंवा खासगी वाहनाने निघाले, त्या लोकांना चैत्राच्या मित्र-मैत्रिणी पाणी आणि सरबतचे वाटप कल्याण फाटा, नवी मुंबईच्या रस्त्यावर करत होते. कोविडोत्तर काळात ‘पुकार’चा आवाका वाढला. लोकांचे समुपदेशन करणे, त्यांच्या खोलीचे भाडे भरणे, मुलांच्या औषधोचाराचे बिल देणे, डॉक्टरची फी देणे असे भरपूर काम ‘पुकार’ने केले. हे सर्व काम मोठ्या देणग्यांच्या ओघाने झाले आहे. हा निधी मुख्यतः ‘क्राउड- फंडिंग’च्या माध्यमातून जमा झाला आहे. आता ‘पुकार’ने महिलांना आर्थिक बळ देऊन सक्षम करण्याला प्राधान्य दिले आहे. आहारतर्फे महिलांना काही छोटा व्यवसाय चालविण्यासाठी पैसे पुरवले जातात. महिलांना शक्य झालं तर त्या ते पैसे परत देतात किंवा तेच पैसे वापरतात. या सर्व महिला चाळिशीच्या वर आहेत. त्यात नवऱ्यापासून वेगळ्या राहणाऱ्या किंवा नवऱ्याने सोडलेल्या महिलांचा समावेश आहे. गोळा झालेल्या मदत निधीतून ज्या मुलांना परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने ‘ऑनलाईन’ शिक्षण घेता येत नव्हते, त्यांना मोबाईलला देऊन, त्यांचे शिक्षण त्यांनी मार्गी लावले आहे. कोरोना महामारीनंतर बऱ्याच महिलांना अनेक समस्यांशी झगडावे लागते. काहींना मुलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैसे नव्हते. चैत्राने अशा महिलांसाठी आतापर्यंत दीड-दोन लाख रुपये उभे केले आहेत. अनेक गरीब महिलांच्या रेशन कार्डमध्ये अडचणी होत्या, त्या सोडवण्यासाठी ‘पुकार ग्रुप’ धावला. याशिवाय महिलांना अडीच ते दहा हजारांपर्यंत रक्कम देऊन त्यांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित केले. अशा २० महिलांना ‘पुकार’ने कर्जरूपात अर्थसाह्य केले. महिलांनी अगरबत्ती, केळीच्या चिप्स, मास्क, पिशव्या शिवून विकणे, प्लास्टिकचे उपकरणे विकणे, असे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. त्यातील ८० टक्के महिलांचे व्यवसाय यशस्वी झाले आहेत. अशीच एक महिला म्हणजे फरीदा. चैत्रा गेल्या वर्षभरापासून तिला मदत करत आहे. ती चैत्राने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अगरबत्त्या बनवायला शिकली. आता ती तिचा पूर्ण खर्च याच व्यवसायावर भागवते. ती बाजारातून कच्चे सामान आणते, त्यातून सुगंधित अगरबत्त्या बनवते, मग त्यांना पॅक करून विकते. तिने आणखी दोन लोकांना तिच्या अगरबत्त्या विकण्यासाठी मदत मागितली आहे, ते लोक घरोघरी जाऊन अगरबत्त्या विकतात. ती आता स्वावलंबी बनली आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. चैत्राच्या पुढाकाराने महिला आपापला व्यवसाय करत आहेत. अडचण आली तर ‘पुकार’ त्यांच्यासाठी आजही धावते आहे. छायाचित्र : चैत्रा यादवर MUM२१D७४०८९ ------------- स्टोरी फोटो : गरजवंतांना मदत करताना चैत्रा यादवर. MUM२१D७४०९१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com