कांदिवली-बोरिवलीसाठी २८४ बेस्ट बसमार्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवली-बोरिवलीसाठी २८४ बेस्ट बसमार्ग सुरू
कांदिवली-बोरिवलीसाठी २८४ बेस्ट बसमार्ग सुरू

कांदिवली-बोरिवलीसाठी २८४ बेस्ट बसमार्ग सुरू

sakal_logo
By
कांदिवली-बोरिवलीसाठी २८४ बेस्ट बसमार्ग सुरू कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः बोरिवली आणि कांदिवलीमधील नागरिकांसाठी बोरिवली पश्चिम प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते कांदिवली स्थानक पश्चिम नवीन २८४ बेस्ट बसमार्ग सुरू करण्यात आला आहे. या बस सेवेचे उद्‍घाटन मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील आणि विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. बोरिवली फलाट क्रमांक एक मुख्य स्थानकापासून लांब असल्याने तसेच मुंबईहून बोरिवलीला येणाऱ्या बहुतांशी ट्रेन तेथे येत असल्याने प्रवाशांना घरी जाणे त्रासदायक ठरत होते. काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बस सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक सूत्राळे, संदेश कोंडविलकर, कमलेश शेट्टी, प्रगती राणे, सदा चव्हाण, राजेश निर्मल, प्रशांत गायकवाड, नगरसेविका श्वेता कोरगावकर आदी सहभागी झाले होते. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top