मुंबई
मुंबईच्या मुलांची भोरच्या स्पर्धेत बाजी
मुंबईच्या मुलांची भोरच्या स्पर्धेत बाजी
प्रभादेवी, ता. २ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भोर येथे आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत प्रभादेवी-दादर येथील मुलांनी नेत्रदीपक कामगिरी करत बाजी मारली. भोर नगर परिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियाना’अंतर्गत विविध वयोगटातील मुलांसाठी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल स्पर्धेत ६ ते १० वयोगटात जिवीन मार्लेशाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर ११ ते २० वयोगटात सिद्धार्थ दावंडे प्रथम, ओमकार चव्हाण दुसरा व रणवीर खाटपे याने तिसरा क्रमांक मिळविला. मुलींमध्ये नीम शुक्ला हिने पहिला क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक विजय दावंडे व पंकज मार्लेशा यांचे मार्गदर्शन लाभले.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.