राज्यात ५० ओमायक्रोन रुग्णांची भर

राज्यात ५० ओमायक्रोन रुग्णांची भर

राज्यात ५० ओमिक्रॉन रुग्णांची भर मुंबईत केवळ एक बाधित सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : आज राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या ५० रुग्णांची नोंद झाली. त्यांपैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने, तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी नोंदवले आहेत. पुणे पालिका ३६, पिपरी-चिंचवड पालिका आठ, पुणे ग्रामीण दोन, सांगली दोन, ठाणे एक आणि मुंबई एक असा रुग्णांचा तपशील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ५१० ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील २६ रुग्ण इतर राज्यांतील आहेत. प्रत्येकी एक रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबादमधील आहे. सात रुग्ण ठाणे तर चार कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. नऊ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. १९३ रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २२८४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांपैकी १३४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com