तोडणाऱ्या झाडांबाबत मुंबई पालिकेची लपवाछपवी?

तोडणाऱ्या झाडांबाबत मुंबई पालिकेची लपवाछपवी?

तोडणाऱ्या झाडांबाबत मुंबई पालिकेची लपवाछपवी? पर्यावरण संघटनांची नाराजी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने भविष्यात तोडाव्या लागणाऱ्या झाडांबाबत सार्वजनिक सूचना मागवल्या आहेत. मात्र यात वृक्ष प्राधिकरणाने चुकीची, अपुरी आणि अवैध माहिती दिल्याचे सांगत पर्यावरण संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृक्ष प्राधिकरण विभागाकडून तोडाव्या लागणाऱ्या झाडांबाबत नोटीस जारी केली आहे. मात्र या नोटिशीत झाड हटवण्याच्या प्रस्तावाचे कोणतेही तपशील किंवा वर्णन दिलेले नाही. यात फक्त ज्या विभागात झाडे तोडायची आहेत, त्या विभागांचा उल्लेख केला आहे. शिवाय पालिकेच्या संकेतस्थळावर सूचना शोधण्यासाठी चुकीची लिंक देण्यात आली आहे, असा आरोप पर्यावरणवादी झोरू भाथेना यांनी केला. सूचना वाचूनच प्रस्तावाची जाणीव व्हावी, हा सार्वजनिक सूचनेचा उद्देश आहे. त्यासाठी संकेतस्थळाची लिंक असणे नेहमीच स्वागतार्ह आहे; परंतु पालिकेने प्रस्तावाचे मूळ वर्णन केवळ प्रभागाचा उल्लेख करून सार्वजनिक सूचनांपासून लपवून ठेवला आहे, असेही भाथेना म्हणाले. केवळ विभागांचा उल्लेख करून पालिका नोटीस देऊन आपले प्रस्ताव कधीही लपवत नाही. हे कोणत्याही पालिकेच्या नोटिशीमध्ये कधीही घडत नाही. झाड तोडण्यासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी अशा चुकीच्या पद्धतीला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी ही भाथेना यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com